ग्लोबल न्यूज: मंगळवार, 1 फेबरुवारी रोजी श्रवण नक्षत्र यासोबतच आजच्या ग्रह स्थितीमुळे व्यतिपात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 6 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या लोकांना धनहानी होण्याची शक्यता आहे. कामामध्ये तणाव वाढू शकतो. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस…
मेष : शुभ रंग : मरून| अंक : १
व्यवसायात उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट करायची तुमची तयारी असेल. आज व्यस्त दिवस.
वृषभ : शुभ रंग : हिरवा| अंक : ७
कार्यक्षेत्रात आज काही बिकट प्रसंग यशस्वीपणे हताळाल. मित्रमंडळी आज तुमचे शब्द झेलतील.
मिथुन : शुभ रंग : जांभळा | अंक : ८
आज स्वत:चा विचार करा. केवळ मोठेपणासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकारू नका. प्रतिकूल दिवस.
कर्क : शुभ रंग : राखाडी | अंक : ९
जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. गृहीणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदीत होतील.
सिंह : शुभ रंग : पांढरा| अंक : २
महत्वाच्या चर्चेत फक्त ऐकण्याचे काम करा. मोफत सल्ले देऊ नका. गोड बोलून स्वार्थ साधून घेणे योग्य.
कन्या : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ६
नोकरदार बढती बदलीच्या बातम्यांनी सुखावतील. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे तास वाढवावे लागतील.
तूळ : शुभ रंग : गुलाबी| अंक : १
तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. यशस्वी व्यक्तींच्या सहवासात तुमच्या महत्वाकांक्षा वाढतील.
वृश्चिक : शुभ रंग : केशरी| अंक : ५
अती हुषार माणसे संपर्कात येतील. कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा नकाे. स्वावलंबन कामी येईल.
धनु : शुभ रंग : आकाशी| अंक : ४
व्यापारी वर्गास अत्यंत लाभदायी दिवस आहे. काही जूनी येणी आज वसूल होण्याची शक्यता आहे.
मकर : शुभ रंग : निळा| अंक : ३
नव्याने झालेल्या ओळखीतून व्यापारवृध्दी होईल. विवाहेच्छूकांना योग्य जिवनसाथीचा लाभ होईल.
कुंभ : शुभ रंग : पिस्ता| अंक : ८
आज तुमची अत्यंत व्यस्त दिनचर्या राहील. एखादा पत्ता शोधण्यासाठी आज बरीच पायपीट होणार आहे.
मीन : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ३
कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध प्रस्थापित होतील. तुमची मोठया लोकांमधील उठबस फायदेशीर राहील.