आज शरद पवार पुन्हा मातोश्रीवर घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट…..!

आज शरद पवार पुन्हा मातोश्रीवर घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट…..!

राज्यात सध्या महाईकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीचा सिलसिला वाढलेला दिसून येत आहे. आज पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मातोश्री येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. आज सायंकाळी ५:००
वाजता ही भेट होणार आहे. या बाबतची माहिती झी २४ या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केली आहे.

त्यातच काल शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांशी संवाद साधला. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांशी संवाद साधला तसेच कोरोना आणि लॉकडाऊनवरही चर्चा झाली. या बैठकीसाठी काही मंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

या आठवड्यातली शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातली ही तिसरी भेट असेल. याआधी मुंबईतल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या गृहमंत्रालयाकडून केलेल्या बदल्या मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्या होत्या. यानंतर महाविकासआघाडीत तणाव वाढला होता. म्हणून सोमवारी शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: