पालखी सोहळा जनक तपोनिधी नारायण महाराज यांचे आज पुण्यस्मरण जाणून घ्या त्यांच्याविषयी
नारायण महाराज – संत तुकोबांच्या वैकुंठगमनाच्या वेळेस तुकोबांच्या पत्नी जिजाबाई गरोदर होत्या. त्यांचे हे धाकटे चिरंजीव म्हणजेच नारायणबाबा. एका आख्यायिकेनुसार नारायण महाराज हे ज्ञानेश्वर माऊलींचेच अवतार मानले जातात.
पालखी सोहळा जनक तपोनिधी नारायण महाराज मंदिर, देहू
नारायण महाराज – संत तुकोबांच्या वैकुंठगमनाच्या वेळेस तुकोबांच्या पत्नी जिजाबाई गरोदर होत्या. त्यांचे हे धाकटे चिरंजीव म्हणजेच नारायणबाबा. एका आख्यायिकेनुसार नारायण महाराज हे ज्ञानेश्वर माऊलींचेच अवतार मानले जातात.
पालखी सोहळ्याचे जनक – आषाढी वारीसाठी देहूहून दिंडीसह जाण्याचा रिवाज तुकोबांच्या पूर्वापार चालू होता तो पुढे तुकोबांच्या मुलांनीही चालू ठेवला. या दिंडी सोहळ्याचे रूपांतर नारायण महाराजांनी पालखी सोहळ्यात केले. नारायण महाराजांनी दिंडी सोबत पालखी घेऊन त्यामध्ये तुकोबांच्या पादुका ठेवल्या.
ही पालखी आळंदीला नेवून तेथे ज्ञानेश्वर माउलींच्या पादुका पालखीत ठेवून ही जोड पालखी पंढरपूरला नेली. अशाप्रकारे नारायण महाराजांनी पालखी सोहळ्यास सुरवात केली. यामुळे नारायण महाराजांना पालखी सोहळा जनक म्हटले जाते.
देहू दर्शन – देहूतील इतर मंदिरे व तुकोबांशी निगडित स्थळे –
मुख्य विठोबा रखुमाई मंदिर – संत तुकाराम महाराज मंदिर
संत तुकाराम महाराज जन्मस्थान मंदिर
संत तुकाराम महाराज वैकुंठगमन मंदिर
अनगडशा दर्गा
भागीरथीबाई मंदिर, येलवाडी
गाथा मंदिर
तुकोबांचे आठवे पूर्वज विश्वंभरबाबा मंदिर
भंडारा डोंगर