बायका मुलांची धमकी कोणाला देता? मुख्यमंत्री आहात की माफिया???’

ग्लोबल न्यूज: शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली असून उद्या ही मुलाखत प्रसारित होणार आहे. महाविकास आघाडीच्या सरकारला वर्ष पूर्ण होत आले, यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘अभिनंदन मुलाखत’ सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलखतीचा प्रोमो त्यांनी आज रिलीज करत ‘उद्या धमाका’ असे लिहिले आहे.

संजय राऊतांनी सरकारच्या वर्षपूर्तीवर मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या मुलाखतीची पहिली झलक चांगलीच व्हायरल होत आहे.

 

मुलाखतीच्या प्रोमोमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फक्त हात धुवा सांगण्यापलिकडे काय करतात? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना इशारावजा उत्तर दिले आहे. यावर त्यांनी ”ठीक आहे, हात धुतो आहे, जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे जाईन”, असा इशारा दिला आहे.

या प्रोमोवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी खरमरीत टीका केली आहे. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. ‘दात पाडू, बघून घेऊ ही रोड छाप भाषा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शोभते का? ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत की गल्लीतल्या पक्षाचे प्रमुख? बायका मुलांची धमकी कोणाला देता? मुख्यमंत्री आहात की माफिया???’ असा खोचक सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

 

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: