राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री करण्याची संधी होती, पण… जयंत पाटलाचं सूचक विधान

 

मुंबई | राज्यात शिवसेना पक्षाने राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर हातमिळवणी करून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते अशातच आता मुख्यमंत्री पदावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठे विधान केले आहे आपल्या पक्षाकडे मुख्यमंत्री करण्याची संधी होती. पण, एकत्रीत काम करायचं असल्याने आपण ती सोडली. पण, २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रात नंबर एकचा पक्ष बनवायचा आहे.

तसेच पुढे बोलताना पाटील म्हणाले की, येणाऱ्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यामुळे जास्तीत जास्त आमदार निवडून आणून शरद पवार यांना भेट द्यायची असल्याचे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न असल्याचे जयंत पाटील यांनी बोलून दाखवले आहे.

पाटील म्हणाले की,२०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेट द्यायची आहे. राष्ट्रवादी महाराष्ट्रातील एक नंबरचा पक्ष बनवायचा आहे. त्यामुळे आत्तापासून तुम्ही कामाला लागला असे आवाहन मंत्री जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. तळेगाव येथे आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात पाटील बोलत होते.

Team Global News Marathi: