मंदिर उघडा बोलायला तुमचं काय जातंय, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

मंदिर उघडा बोलायला तुमचं काय जातंय, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून राजयोतील जनतेशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी मेट्रो कारशेड, आरे आंदोलनावरील परिवाराण प्रेमींवर झालेले गुन्हे तसेच आरेची जागा जंगल म्हणून घोषित याविषयावर आपले मत मंडळ होते. तसेच राज्यात मंदिरे उघडण्याबाबत सुरु असलेल्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी आज भाष्य केले होते.

मंदिराच्या विषयावर मी हळूवार जातोय. काही जण म्हणतात, तुम्ही हे उघडलं, ते उघडलं नाही. मंदिरे उघडा सांगायला तुमचे काय जाते? जबाबदारी तुमच्यावर नाही, आमच्यावर आहे. त्यापेक्षाही जनतेवर आमचं प्रेम आहे. उगाच तंगडयात तंगड घालून, गोष्टी बंद ठेवण्याची आमची मानसिकता नाही, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला फैलावर घेतले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना अजून आपल्यातून गेला नाही. जगात काही देशात तर याची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे आपल्याला सावधपणे पुढे जावे लागत आहे. आता नवरात्री येत आहे, त्यानंतर दिवाळी आहे. खूप काळजीपूर्वक एक-एक पाऊल टाकावे लागणार आहे.

उघडलेल्या दरवाजातून सुबत्ता, समृद्धी आली पाहिजे, करोना नको, तरच त्या उघडलेल्या दरवाजाला अर्थ आहे. जनतेच्या प्रेमापोटीच मंदिरे, लोकल आणि जीमसंदर्भातील निर्णय आपण अजून घेतलेला नाही. सुरु केलेली कोणतीही गोष्ट आपल्याला पुन्हा बंद होऊ द्यायची नाही याचा पुनरुच्चार करतांना मुख्यमंत्र्यांनी जनतेला लॉकडाऊन लावण्याची वेळ पुन्हा येऊ देऊ नका, शिस्त पाळा, आरोग्य सांभाळा असे आवाहन केले होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: