‘तो’ सर्व्हे 13 कोटी जनतेचा नाही, भाजपने उडवली खिल्ली

 

–सी वोटर ‘मूड ऑफ द नेशन’ या सर्वेक्षणात शभरात सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? याचीही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.या यादीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पिछाडीवर असल्याने निदर्शनास आले. आता या सर्वेवरून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे यांनीं सर्वेची खिल्ली उडवली आहे. सी व्होटरचा सर्व्हे म्हणजे १३ कोटी जनतेचा नाही, असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

सी व्होटर सर्व्हेवरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समन्वयाने भाजप संघटना मजबूत करणार आहे. ५१ मतांच्या मताची टक्केवारी आम्ही तयार करून महाराष्ट्रात लोकसभेच्या ४५ हून अधिक जागा जिंकू, सा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

–सी वोटर ‘मूड ऑफ द नेशन’ या सर्वेक्षणात शभरात सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? याचीही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.या यादीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पिछाडीवर असल्याने निदर्शनास आले. यावरूनच महाविकास आघाडीने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला होता.

Team Global News Marathi: