“ते आमदार अफगाणिस्तानमधून तालिबानची ट्रेनिंग घेऊन आले आहेत का?”

 

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल १२ आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरून सायंकाळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना भेटले होते याच मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केले आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यातील बैठक सकारात्मक झाली असून राज्यपाल १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत सकारात्मक आहेत. पण, त्यांनी इतके दिवस का हा प्रस्ताव का मंजूर केला नाही? त्यांच्यावर राजकीय दबाव आहे का? हे राज्यपालांनी स्पष्ट करावं, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.

ठाकरे सरकार अंसैविधानिक काम करत नाही हे राज्यपालांना देखील माहिती आहे. राज्य ज्या संकटासोबत संघर्ष करत आहे, त्यात राज्यपालांनी मार्गदर्शन करायला पाहिजे. भेटीच्या संदर्भात निर्णय काय लागेल हे राज्यपालांनी दाखवायला हवं. १२ आमदारांच्या नियुक्तीचा मंत्रिमंडळांनी घेतलेला निर्णय चुकीचा नाही. तो राज्यपालांनी फक्त मंजूर करायचा आहे. महाराष्ट्रात कधीही राज्यपाल आणि राज्य सरकार असा संघर्ष दिसला नाही. तो आज का होतोय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.

ते म्हणाले की, यामध्ये उच्च न्यायालयाला मध्ये येण्याची गरज नव्हती. हा एक स्पष्ट कार्यक्रम होता. १२ जागा राज्यपाल नियुक्त केलेल्या आमदारांना मंजुरी देणे हे राज्यपालांचं कर्तव्य असतं. राज्यपालांनी ते गेल्या ८ महिन्यापासून केलेले नाही. ते आमदार अफगाणिस्तानमधून तालिबानची ट्रेनिंग घेऊन आले आहेत का? कोणी लेखक, कलाकार, तर कोणी वेगवेगळ्या समाजातून आलेले आहेत. त्यांचे अधिकार तुम्ही कसे डावलू शकता? असेही राऊत म्हणाले.

Team Global News Marathi: