आजवर महाराष्ट्राचा एकही नेता पंतप्रधान का झाला नाही? गडकरी म्हणतात की

 

 मुंबई | महाराष्ट्राचा पंतप्रधान का झाला नाही या प्रश्नाला उत्तर डेटनं भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला पाहिजे, असं मला अजिबात वाटत नाही. महाराष्ट्रासह देशाचा विकास करणारा योग्य व्यक्ती पंतप्रधान झाला पाहिजे. मग त्याची जात, धर्म, पंत आणि राज्य कोणतंही असो, असं नितीन गडकरी यांनी बोलताना स्पष्ट केलं.

आपण देशाच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीत प्रवेश करत आहोत. पण पंच्याहत्तर वर्षात महाराष्ट्राचा एखादा नेता, देशाचा पंतप्रधान झाला? असा प्रश्न एका वरिष्ठ संपादकाने विचारल्यावर गडकरी म्हणाले की, “महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला पाहिजे, असं मला अजिबात वाटत नाही. महाराष्ट्रासह देशाचा विकास करणारा योग्य व्यक्ती पंतप्रधान झाला पाहिजे. मग त्याची जात, धर्म, पंत आणि राज्य कोणतंही असो. त्यामुळे मराठी माणूसच झाला पाहिजे, किंवा महाराष्ट्रातीलच झाला पाहिजे, असं काही मला मान्य नाही.

आज एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझा व्हिजन या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रासाठीचं आपलं व्हिजन मांडलं होता. राज्यातील पाणी प्रश्न, शेतकरी आत्महत्या, आयात-निर्यात, तसेच राज्यातील रस्त्यांबाबातही त्यांनी भाष्य केलं. याच कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी मोठी घोषणाही केली. सूरतपासून नाशिक, नाशिकहून अहमदनगर आणि अहमदनगरहून सोलापूर असा नवा महामार्ग तयार केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रकल्पामुळं पुणे-मुंबईचं ५० टक्के ट्रॅफिक कमी होणार असल्याचंही ते म्हणाले.

Team Global News Marathi: