मनसे सोबत युती होण्याच्या चर्चेला फडणवीसांनी दिला पूर्णविराम

राज्यात शिवसेना पक्षाने २५ वर्ष जुन्या भाजपा पक्षाला दूर सारून राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षसोबत युती करून राज्यात आघाडीचे सरकार स्थापन केले होते. त्यानंतर भाजपा येणाऱ्या मनपा निवडणुकीला मनसे सोंबत युती करतील अशी चर्चा सुद्धा सुरु होती तसेच फडणवीसांचे निकटवर्तीय प्रसाद लाड हे सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला पोहचले होते.

मात्र मनसे सोबत युती होणार का? यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा देऊ मनसे सोबत होणाऱ्या युतीच्या चर्चेला पुर्नविराम दिला आहे. त्यामुळे यंदा भाजपा स्वबळावर मुंबई मनपा काबीज करण्याचे स्वप्न पाहताना दिसत आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी निमंत्रित केल्यानुसार आपण गुरुवारी महापालिकेतील प्रकल्पांबाबत आढावा बैठक घेतल्याचे त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. मुख्यमंत्री असताना पुण्यातील अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली होती. त्यातील निवडक प्रकल्पांचा आढावा घेतला आहे. महापालिकेचे पदाधिकारी उत्तम काम करत असून, प्रकल्पांची कामेही सुरू आहेत. सर्वच महापालिकांनी वेग घेतला पाहिजे असे बोलून दाखवले.

Team Global News Marathi: