मुंबई : सोमवारी केंद्र सरकारने टिकटॉकसह ५८ चायनीज अॅपवर बंदीची घोषणा केली होती. त्यानंतर आजपासून भारतात टिकटॉक बंद व्हायला सुरुवात झाली आहे.
मंगळवारी सकाळपर्यंत काहीजणांचे टिकटॉक अकाऊंट सुरु होते. मात्र त्यांनी लाॅगीन केल्यानंतर त्यांना तात्काळ मेसेज यायचा की लवकरच तुमचे टिकटॉक अकाऊंट बंद केले जाणार आहे. याच सर्व ग्राहकांनी मंगळवारी संध्याकाळी त्यांचे अकाऊंट उघडण्याचा प्रयत्न केला तर, ते उघडलेच नाही. ते लाॅक करण्यात आल्याचे त्यांना संदेश आले. आता गुगल प्ले स्टोअर वरुनही सोमवारी बंदी घालण्यात आलेले सर्व ५९ चायनीज अॅप काढून टाकण्यात आले आहेत.