आता कोरोनाच्या उपाययोजनेसाठी बार्शी, अकलूज व कुंभारीतील ‘ही’ तीन हॉस्पिटल डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल

कोरोनाच्या उपाययोजनेसाठी बार्शी, अकलूज व कुंभारीतील तीन हॉस्पिटल डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित- जिल्हाधिकारी

सोलापूर, दि.2 : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी अकलूज, कुंभारी आणि बार्शीतील तीन दवाखाने डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला आहे. याबाबतच्या आदेश जारी केले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलसाठी (डीसीएच) खाटांची संख्या कमी पडू नये, यासाठी राणे हॉस्पिटल, अकलूज येथील 50 खाटा, अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, कुंभारी (100 खाटा) आणि बार्शीतील सुश्रुत हॉस्पिटल (50 खाटा) इमारत, परिसर, मनुष्यबळ, जीरक्षक प्रणालीसह आवश्यक साधन सामग्रीचा ताबा जिल्हा शल्यचिकित्सक यांना देण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे

ग्लोबल न्युज नेटवर्क: