हजारो वीज कामगारांचा दिवाळी पूर्वी संपाचा इशारा वाचा सविस्तर वृत्त

हजारो वीज कामगारांचा दिवाळी पूर्वी संपाचा इशारा वाचा सविस्तर वृत्त

बोनस संदर्भात तिन्ही वीज कंपन्यांचे व्यवस्थापक आणि कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधीमधील बैठक अयशस्वी ठरल्याने ऐन दिवाळीच्या दिवशी १४ नोव्हेंबरला सकाळी ८ पासून राज्यातील ८६ हजार वीज कर्मचारी संपावर जाण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तीन कंपन्यांमध्ये ८६ हजार कामगार, अभियंते व अधिकारी काम करतात. कामगार संघटनांचे प्रतिनिधी व ऊर्जा सचिव असिम गुप्ता, तिन्ही कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यात बोनसच्या मागणीबाबत गुरुवारी चर्चा झाली. २७ संघटनांनी पत्राद्वारे बोनस-सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केलेली आहे. त्यासाठी तिन्ही कंपन्यांनी मिळून राज्यातील सर्व वीज कर्मचाऱ्यांना १२० कोटी रुपयांचे सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी के ली.

करोनाच्या टाळेबंदीमुळे यंदा वीजविक्रीतून मिळणारा महसूल घटला असल्याने सद्य:स्थितीत ही रक्कम देता येणार नाही, असे व्यवस्थापनाने स्पष्ट के ले. त्यामुळे १४ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजल्यापासून संप करण्याचा निर्णय कामगार संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला असून गुरुवारपासून राज्यभर निदर्शने सुरू झाली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: