कोरोनामुळे मरणारे जगण्याच्या लायक नाहीत, संभाजी भिडे गुरुजी यांचे विधान.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असलेले शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांनी पुन्हा एकदा थोडे हटके विधान केले आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. आता त्यांच्या या विधानामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

कोरोना हा रोगच नाही आणि जी लोक कोरोनामुळे मरतात ते जगायला लायक नाही’, असं म्हणत संभाजी भिडे गुरुजी यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर टीका केली. दारुची दुकानं उघडी आणि बाकी काही विकणाऱ्यांना पोलीस काठ्या मारतात. हा काय चावटपणा आहे, कोरोनामुळे संबंध देशातील लोकांमध्ये अस्वस्था आहे, असेही भिडे गुरुजी म्हणाले आहेत.

भिडे गुरुजी यांनी सांगलीत लॉकडाउनच्या विरोधात रस्त्यावर उतरून त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. तसेच मास्क लावणे हा सगळा मूर्खपणा आहे. कोरोना हा ** वृत्तीच्या लोकांना होणारा मानसिक रोग आहे. तसेच मास्क लावल्याने कोरोना होत नाही हा शोध कुण्या शहाण्याने लावला आहे? असेही ते म्हणाले आहेत. आता त्यांच्या या विधानावर काय-काय प्रतिक्रिया येतात हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: