असा असेल नवीन सातबारा उतारा ; वाचा सविस्तर-

ग्लोबल न्यूज: राज्य सरकार लवकरच साधा आणि सोपा असा ७/१२ तयार करणार आहे. सध्या सगळे व्यवहार हे संगणकाच्या माध्यमातून होतात. त्यामुळे काळाची गरज लक्षात घेत नवीन ११ बदल करत नवीन सातबारा तयार करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यासंबंधातील प्रस्ताव हा राज्य शासनाला पाठवण्यात आला असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दल सादरीकरण देखील करण्यात आलं आहे.

सुधारित संगणकीकृत गाव नमुना नं ७/१२ मध्ये प्रस्तावित केलेले बदल खालीलप्रमाणे आहेत.

  1. गाव नमुना नं.७ मध्ये गावाचे नावासोबत L.G.D (Local Government Directory) कोड दर्शविण्यात येईल.
  2. गाव नमुना नं. ७ मध्ये अ) लागवडीयोग्य क्षेत्र व ब) पोट खराब क्षेत्र या सोबत एकूण क्षेत्र (अब) दर्शविण्यात येईल.
  3. नमुना ७ मध्ये नमूद क्षेत्राचे एकक काय आहे? हे समजण्यासाठी क्षेत्राचे एकक हा स्वतंत्र रकाना समाविष्ट करण्यात येत आहे. यात शेती क्षेत्रासाठी हे.आर.चौ.मी. आणि बिनशेती क्षेत्रासाठी आर.चौ.मी.हे एकक वापरले जाईल. 
  4. ताई राजकारण करायचं असेल तर आपल्या गावी निघून जा – सुबोध भावे
  5. नमुना ७ मध्ये खाते क्रमांक या पूर्वी इतरहक्क रकान्यासोबत नमूद केला जात असे तो आता खातेदार / खातेदारांच्या नावासोबतच नमूद केला जाईल.
  6. नमुना ७ मधील मयत खातेदार अथवा संपूर्ण क्षेत्र विक्री केलेले खातेदार व इतरहक्कातील कमी केलेले कर्ज बोजे अथवा ई-कराराच्या नोंदी कंस करून दर्शविल्याजात होत्या, आत्ता ती कमी केलेली नावे व नोंदी कंस करून त्यावर एक आडवी रेषामारून खोडून (strike through) दर्शविण्यात येतील.
  7. कोणत्याही नमुना ७ वर नोंदवलेले परंतु निर्गत न झालेले फेरफार (प्रलंबित असे पर्यंत) प्रलंबित फेरफार म्हणून इतर हक्क रकान्याच्याखाली स्वतंत्र रकान्यात दर्शविण्यात येतील. संबंधित भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांकावर एकाही फेरफार प्रलंबित नसल्यास प्रलंबित फेरफार नाही असे दर्शविण्यात येईल.
  8. WhatsApp Time | तुमचं चॅटिंग कोणीच वाचू शकणार नाही | भन्नाट सेटिंग फीचर्स ; वाचा सविस्तर-
  9. कोणत्याही नमुना ७ वर नोंदविण्यात आलेला शेवटचा फेरफार क्रमांक व त्याचा दिनांक इतरहक्क रकान्याचे खाली शेवटचा फेरफार क्रमांक व दिनांक या नवीन रकाना समाविष्ट करून दर्शविण्यात येईल. फेरफार घेण्याची प्रक्रिया ई फेरफार प्रणालीद्वारे ऑनलाईन सुरु झाल्यापासून एखाद्या स.नं / गट नं. वर एकही फेरफार नोंदविला नसल्यास शेवटचा फेरफार क्रमांक व दिनांक या रकान्यात काहीही दर्शविले जाणार नाही.
  10. नमुना ७ वरील सर्व जुने फेरफार क्रमांक नमुना ७ वर सर्वात शेवटी जुने फेरफार क्रमांक या नवीन रकान्यात एकत्रीतरित्या दर्शविण्यात येतील.
  11. शेती क्षेत्रासाठी व बिनशेती क्षेत्रासाठी स्वतंत्र गाव नमुने थोडासा बदल करून दर्शविण्यात येतील. बिनशेती च्या ७/१२ मध्ये पोट खराब क्षेत्र, जुडी व विशेष आकारणी, तसेच इतर हक्कात कुळ व खंड हे रकाने वगळण्यात येतील.
  12. मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्यानी नरेंद्र मोदींना देखील देश पालथा घालण्यास सांगण्याचे धाडस करावे-संजय राऊत
  13. नमुना ७ मधील कोणत्याही दोन खात्यातील नावांचे मध्ये डॉटेड लाईन छापण्यात येईल त्यामुळे खातेदारांचे नावामध्ये अधिक स्पष्टता येईल.
  14. बिनशेती क्षेत्राचे नमुना ७ साठी नमुना १२ ठेवणे आवश्यक नसल्याने बिनशेती क्षेत्रासाठी नमुना १२ छापला जाणार नाही. व त्यावर सदरचे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रुपांतरीत झाले असल्याने या क्षेत्रासाठी गाव नमुना न. १२ ची आवश्यकता नाही अशी सूचना छापण्यात येईल.
ग्लोबल न्युज नेटवर्क: