हा व्हायरस करतोय संपूर्ण बँक खाते रिकामे; अशी घ्या स्मार्टफोन वापरताना काळजी

 

स्मार्टफोन आता आपल्या प्रत्येकाच्याच हाती आला असून आयुष्यातील महत्त्वाचा भाग झाला आहे. आपल्या वैयक्तिक फोटो, व्हिडिओंपासून ते आपल्या बँक डिटेल्सपर्यंत सर्वच बाबी आपल्या स्मार्टफोनमध्ये म्हणजेच मोबाईलमध्ये असतात. सध्या दिगितील युगात कॉड स्कॅन करून पेमेंट करण्याची नवी पद्धत आली आहे पण आता आपल्या या वैयक्तिक माहितीची चोरी करणारा BRATA हा व्हायरस आपली चिंता वाढवणार आहे.

स्मार्टफोनने खऱ्या अर्थाने आपले जीवन स्मार्ट केले आहे. पण त्याचा वापर करताना आपल्यालाही स्मार्ट रहावे लागते. नाहीतर आपली वैयक्तिक माहिती चोरी होण्याची शक्यता असते. BRATA या नवीन व्हायरसपासून तर अँड्रॉइड वापरकर्त्यांनी सावध राहण्याची गरज आहे. कारण आपली एक चूकही आपले बँक खाते रिकामे करू शकते, इतकी ताकद या व्हायरसमध्ये आहे.

BRATA हा मालवेअरचा नवीन प्रकार असून, तो अँड्रॉइड हँडसेटमध्ये असलेल्या बँकिंग अॅपची सुरक्षेला धोका पोहोचवतो. एका संशोधनानुसार, हा नवीन प्रकार डिव्हाइसचा डेटादेखील नाहीसा करतो. या व्हायरसचा शोध लागण्यामागे एक प्राप्त झालेली तक्रार कारणीभूत ठरली. BRATA मालवेअरचा एक नवीन प्रकार Android हँडसेटमध्ये उपस्थित असलेल्या बँकिंग अॅपची सुरक्षा तपासणी फसवून पैसे चोरू शकतो, असे या तक्रारीतून समोर आले. संशोधनानुसार, नवीन प्रकार डिव्हाइसचा डेटादेखील हटवते.

 

Team Global News Marathi: