‘हे’ सत्तेला चिकटलेले अन गांभीर्य नसलेले सरकार .! चंद्रकांत पाटील यांची जोरदार टीका !

 

मराठा आरक्षण असो, ओबीसींचे राजकीय आरक्षण असो अथवा सध्याची पूर परिस्थिती असो राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोणत्याच विषयी गंभीर नाही. सत्तेला चिकटलेले हे तर गांभीर्य नसलेले सरकार आहे अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

महापुराची परिस्थिती असताना मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत, मंत्री झोपा काढत आहेत काय ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तसेच अन्य एका प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलताना “पंकजा मुंडे कोणावरही नाराज नाहीत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शुक्रवारी नगरमध्ये पक्षाच्या बैठकीसाठी आले होते. यावेळी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री भाजपाचे दिवंगत नेते दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

तसेच येथील आनंदऋषी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेत आदरांजली वाहिली. यावेळी पत्रकारांशी पाटील यांनी संवाद साधला. पूर स्थितीकडे निर्देश करीत पाटील म्हणाले, २०१९ मध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा येथे प्रचंड पूर आला होता.तेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर मी महसूलमंत्री होतो.

आम्ही जीवापाड परिश्रम घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतरही आमच्यावर टीका करण्यात आली. त्यावेळी चंद्रकांत पाटील कुठे आहेत अशी विचारणा करणारे सध्याचे मंत्री कुठे आहेत ?,पूर परिस्थितीचे राजकारण आम्ही करीत नाहीत.मात्र कोल्हापूर जिल्ह्याला तीन मंत्री आहेत. हे तिन्ही मंत्री झोपा काढत आहेत का ? कारण कोल्हापूरची कोरोना रुग्णसंख्या अजून कमी होत नाही. महापूर स्थिती निर्माण झाली आहे. आम्ही फक्त बघत बसायचे काय ?असे पाटील म्हणाले.

 

Team Global News Marathi: