हे एकचं वाक्य अनेकवेळा बोलण्याचा संजय राऊतांचा विक्रम, प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा टोला

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ ठेवल्या प्रकरणात तब्बल १३ तासांच्यावर सचिन वाझे यांची NIA कडून चौकशी करण्यात आली होती. अखेर १३ तासांच्या चौकशीनंतर वाझे यांना NIA कडून अटक करण्यात आली आहे. यावर आता विरोधकांनी आघाडी सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे.

“मुंबई पोलिसांच्या क्षमतेवर हा हल्ला करण्याचा प्रयत्न आहे. मुंबई पोलिसांची क्षमता जगाला माहिती आहे. मुंबई पोलीस कोणाच्याही दबावाखाली येत नाहीत पण राज्यात घुसायचं, राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करायचा, केंद्राचा दबाव आणि दहशत आहे हे दाखवायचं अशा पद्धतीने कारवाई करण्यात आली आहे. हे सगळं राजकारण सुरू आहे अशी टीका राऊत यांनी केली होती आता राऊत यांच्या टीकेला भाजपाचे मुख्यप्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राऊतांच्या विधानावर टोला लगावला आहे.

संजय राऊत यांच्या नावे एकच वाक्य सर्वाधिकवेळा बोलायचा विश्वविक्रम नोंदवला जाईल असं दिसतंय आणि ते वाक्य असेल, ‘हा सरकार अस्थिर करायचा प्रयत्न आहे’, असा टोला उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन लगावला आहे.

Team Global News Marathi: