हा महाराष्ट्र आहे इथे मराठीतच बोलायचं;राज्यपालांची भूमिका

 

यवतमाळ | हा महाराष्ट्र आहे, इथे कार्यक्रमांत मराठीतच सूत्रसंचालन झाले पाहिजे, अशी आग्रही भूमिका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मांडली. मराठी ही मातृभाषा आहे याचं भान राखलं पाहिजे. महाराष्ट्रात मराठी भाषा ही सगळीकडे अनिवार्य असली पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त केले. राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थित यवतमाळ येथे स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृती निमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंग्रजीमध्ये करण्यात येणाऱया सूत्रसंचालनावरून राज्यपाल कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त करत कार्यक्रमात मराठी सुत्रसंचालनाचा आग्रह धरला. मराठी भाषा आणि तीचे महत्व सांगताना राज्यपालांनी त्यांच्यासोबत झालेला एक किस्सा आणि त्यानंतरच्या परिणामांबद्दल भाष्य केलं.

राज्यपाल म्हणाले, महाराष्ट्रात आलो तेक्हा मला अनेक शैक्षणिक संस्थांच्या कार्यक्रमांना बोलकण्यात आलं. मी एका ठिकाणी सूत्रसंचालक इंग्रजीमध्ये बोलताना पाहिलं. त्यावेळी त्याला हटकलं आणि विचारलं की तुला मराठी ठाऊक नाही का? अरे हा महाराष्ट्र आहे. इथे मराठीमध्ये सूत्रसंचालन केलं पाहिजे. प्रमुख पाहुणे बाहेरच्या राज्यातील असेल, परदेशातील असेल किंवा त्यांना मराठी, हिंदी कळत नसलं तर इंग्रजी समजू शकतं. पण आता मराठीत बोलण्यास काय अडचणी आहेत, असा प्रश्न आपण त्याला त्यावेळी विचारल्याचं कोश्यारी यांनी सांगितलं.

तसेच, त्या दिवसानंतर मी जिथेही जातो तिथे लोक माझ्याशी मराठीमध्ये बोलतात. सूत्रसंचालनही मराठीमध्ये करतात. संस्कृत आणि हिंदीप्रमाणेच मला मराठीही फार गोड भाषा वाटते कारण ती फार सरळ, साधी भाषा आहे. बोलण्याचा माझा अभ्यास अजून झालेला नाहीय. सध्या मी मराठी वाचू शकतो आणि समजू शकतो, असं कोश्यारी यांनी सांगितलं.

Team Global News Marathi: