हा तर महाराष्ट्राचा अपमान ! राज्यपालांच्या त्या भेटीवरून संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

हा तर महाराष्ट्राचा अपमान ! राज्यपालांच्या त्या भेटीवरून संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

ग्लोबल न्यूज : वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यावर आज शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान. मुख्यमंत्री लोकनियुक्त असतात, राज्यपालांना अधिकार नसतात.

राज्यपालांसाठी राजभवन उत्तम जागा आहे त्यांनी आरामात राहावं. त्यांची नियुक्ती केंद्राकडून होते, खर्च राज्य शासन करते. राजभवन राजकारण करण्याची जागा नाही. बाहेर या मैदानात आम्ही राजकारण करू, असे आव्हान खासदार राऊत यांनी राज्यपालांना त्यांचे नाव न घेता दिले.

भाजपचे नेतेही शरद पवारांना मानतात

राज्यपालांनी पवारांकडे जायला सांगितलं असेल तर चांगलं आहे. त्यांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे पाठवावे. याचा अर्थ ते आणि भाजपचे नेतेही पवारांना आपले नेते मानतात. त्यांना मार्गादशन हवं असेल तर मी पवारांशी बोलेन, असेही खासदार राऊत म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: