‘ही तर ट्रायल मॅच’… गुलाबराव पाटील यांचा भाजपला जोरदार टोला

‘ही तर ट्रायल मॅच’… गुलाबराव पाटील यांचा भाजपला जोरदार टोला

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे. मराठवाडा मतदारसंघात सतिश चव्हाण विजयी झाले आहेत, नागपूर पदवीधर मतदारसंघात आघाडीचे अभिजीत वंजारी विजयी झाले आहेत. तर पुणे पदवीधर मतदार संघातून अरुण लाड यांनी बाजी मारली आहे.

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी 48 हजार 824 मतांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव केला आहे. या जागेवर गेली कित्येक टर्म भाजपचा गाजावाजा होता. खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दोनदा या मतदारसंघातून निवडून आले होते.

महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच राज्यपातळीवर आम्ही एकत्रित निवडणूक लढलो. त्यात आम्हाला घवघवीत यशही मिळाले आहे. विशेष म्हणजे भाजपच्या जागीही आम्ही विजयी झालो आहोत.

या निवडणुकीचा निकाल म्हणजे सरकार चांगलं काम करत असल्याचा जनतेनेच दिलेला हा निर्वाळा आहे, असं सांगतानाच ही तर ट्रायल मॅच आहे, असं पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. धुळे-नंदूरबार येथे अमरीश पटेल यांचा झालेला विजय हा भाजचा विजय नाही. पटेल हे त्यांच्या कामामुळे निवडून आलेले आहेत, असंही ते म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: