हे सरकार पहाटेच नाही तर उघडपणे शपथ घेऊन स्थापन झालं आहे – नितीन राऊत

औरंगाबाद | राज्यात तीन पक्षाचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधात बसलेले भारतीय जनता पक्ष तीन पक्षाच्या सरकारवर जोरदार टीका करताना दिसून आले आहे, तसेच आघाडीच्या नेत्यानकडून सुद्धा या टीकेला सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. त्यातच आता विरोधकांच्या टीकेला कॉन्रेस नेते आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी जोरदार टोला लगावला आहे, यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथ विधीचा विषय काढून फडणवीसांना टोला लगावला आहे.

गुप्त बैठकीचे अनेक सूर असतात, हे सरकार पहाटेच्या अंधारात झालेलं नाही, उघडपणे शपथविधी घेणारं हे सरकार आहे. तिन्ही पक्ष सोबत काम करतील, सरकार पडणार नाही, असा विश्वास ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केला. ते औरंगाबादेत बोलत होते. यावेळी त्यांना संजय राऊत आणि शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केल्यावरुन नितीन राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावेळी नितीन राऊत म्हणाले, “हे सरकर पहाटेचं नाही, तर उघडपणे शपथ घेऊन स्थापन झालं असून ते भक्कमपणे उभं आहे. आम्ही पूर्ण काम करणार, जोरात करणार. आम्ही एक आहोत म्हणून चांगलं काम होतंय” असे त्यांनी बोलुन दाखवलं आहे.

यावेळी मंत्री नितीन राऊत यांनी वीजबिलावर भाष्य केले होते हवे तर सवलत दिली जाईल, मात्र वीजबिल माफ होऊ शकत नाही. सार्वजनिक कंपन्या चालवण्याला पैसे लागतात, त्यामुळं वीज बिल भरावं लागेल, वीज बिल माफ करण्याचे काम केंद्र सरकारचे आहे, केंद्र सरकारने मदत केली तर राज्य सरकारही पुढं येईल, असं नितीन राऊत म्हणाले.

Team Global News Marathi: