“ही राक्षसी वृत्तीची बाई,नीचपणाचा कळस करते’ महापौर पेडणेकर यांनी साधला कंगना रानौतवर निशाणा

 

मुंबई | अभिनेत्री कंगनाराणावतने पुन्हा एकदा स्वातंत्र्यावरून वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भारताला १९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य भीक होती असे वक्तव्य केल्यानंतर कंगनाने आता चक्क महात्मा गांधींवर निशाणा साधला आहे. तिच्या या दोन्ही विधावरून तिच्यावर सर्व स्थरातून टीका होताना दिसून येत आहे, तसेच अनेकांनीतीच्या या विधानाचा समाचार घेतला आहे.

 

कंगनाच्या या वक्तव्याचा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. तिच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत त्यांनी ही राक्षसी वृत्तीची बाई असल्याचे म्हटले आहे. ‘भयानक आहे, भयानक आहे, ही राक्षसी वृत्तीची बाई आहे. एकावर एक एकावर एक नीचपणाचा कळस करते, त्यामुळे सकाळी सकाळी या बाईचं नावंही घेऊ नये,’ असे म्हणत त्यांनी यावर जास्त भाष्य करणे टाळले.

कंगनाने काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना भारताला १८९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य भीक होती असं सांगत खरं स्वातंत्र्य नरेंद्र मोदी सरकार २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर मिळाल्याचं म्हटलं होतं. यानंतर मोठा वाद निर्माण झाला असून कंगनाच्या वक्तव्यावरुन संताप व्यक्त केला जात आहे

 

Team Global News Marathi: