प्रताप सरनाईक यांना ईडीची तिसरी नोटीस, १० डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश

प्रताप सरनाईक यांना ईडीची तिसरी नोटीस, १० डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश

ग्सक्तवसुली संचनालयाने (ईडीने) टॉप सीक्युरिटी कंपनीच्या कथित मनी लॉन्डरिंग प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना तिसऱ्यांना चौकशीसाठी हजार राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. येत्या १० डिसेंबर रोजी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे.

टॉप सीक्युरिटी कंपनीच्या आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यातील संशयास्पद धागेदोरे ईडीच्या हाती लागले आहे. त्यानुसार ईडीने ठाणे, मुंबईतील घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. त्यात विहंग सरनाईक यांची तब्बल सात तास ईडीच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली होती.

त्यात सरनाईक यांना चार-पाच वेळा चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ईडीकडून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र सरनाईक यांनी दोन वेळा ईडीच्या नोटीसाकडे दुर्लक्ष केले आहे. मात्र आता ईडीने १० डिसेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे सक्त आदेश आमदार प्रताप सरनाईक यांना दिले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: