ते आले तर नाव महाराजांचे घेतील आणि काम मुघलांचे करतील – देवेंद्र फडणवीस

 

दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या दादरा नगर-हवेली येथे ठाण मांडून बसले आहे त्यातच त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षावर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. शिवसेना संधीसाधू असून दादरा-नगर हवेलीत मृत्यूच्या लाटेचं राजकारण करत असल्याचा आरोपही फडणवीसांनी केला आहे.

शिवसेनेने दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनाच त्यांचा उमेदवार म्हणून जाहिर केलं आहे. तर भाजपकडून महेश गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महेश गावित यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीसांनी सभा घेतली. या सभेत बोलताना फडणवीसांनी शिवसेनेवर टीकेची तोफ डागली आहे. शिवसेनेनं पंतप्रधान मोदींच्या नावावर ५६ जागा मिळवल्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेले, अशी टीकाही फडणवीसांनी केली आहे.

ते म्हणाले की, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार खंडणीखोर असल्याचा आरोप करत ते तुम्हाला इथे हवे आहेत का? अशी विचारणाही फडणवीसांनी केली. जर ते इथे आले तर नाव महाराजांचे घेतील आणि काम मुघलांचे करतील, अशी जळजळीत टीकाही फडणवीसांनी शिवसेनेवर केली आहे.

Team Global News Marathi: