“ते माझे आई-बाबा आहेत, म्युझियमधील प्राणी नाहीत” मनमोहन सिंह यांच्या मुलीने भाजपाला सुनावले

नवी दिल्ली | माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग प्रकृती अस्वास्थ्यामुळे एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी विविध पक्षातील नेतेमंडळी एम्समध्ये जाऊन त्यांची भेट घेत आहेत. यातच केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय मनमोहन सिंग यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. मात्र, यावेळी मनमोहन सिंग यांच्या कन्या दमन सिंग यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते माझे आई-वडील आहेत. प्राणिसंग्रहालयातील दिखावू प्राणी नाहीत, या शब्दांत नाराजी व्यक्त केली.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भेटीसाठी एम्स रुग्णालयात गेले होते. यावेळी एक फोटोग्राफर सोबत होता. मनमोहन सिंग यांच्या पत्नींनी या फोटोग्राफरला बाहेर जायला सांगितले. मात्र, त्याने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि मनमोहन सिंग यांचा एक फोटो घेतला. यावरून मनमोहन सिंग यांची कन्या दमन सिंग यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

माझे आई-वडील सध्या कठीण प्रसंगातून जात आहेत. माझ्या आईने फोटोग्राफरला बाहेर जाण्यास सांगितले. मात्र, त्याने ते ऐकले नाही. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय हेही याबाबत काही बोलले नाही. इतकेच नव्हे तर त्यांच्यासोबत एम्सचे संचालयक डॉ. रणदीप गुलेरियाही होते. तरीही माझ्या आई-वडिलांना त्रास सहन करावा लागला. ते माझे आई-वडील आहेत, कोणत्याही प्राणिसंग्रहालयात पाहण्यासाठी ठेवलेले प्राणी नाहीत, या शब्दांत संताप व्यक्त केला आहे.

Team Global News Marathi: