Saturday, September 23, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आजपासून आर्थिक जगाशी संबंधित हे नियम बदलणार ; जाणून घ्या काय होणार परिणाम

by ग्लोबल न्युज नेटवर्क
August 1, 2023
in मनोरंजन
0
आजपासून आर्थिक जगाशी संबंधित हे नियम बदलणार ; जाणून घ्या काय होणार परिणाम

आज 1 ऑगस्टपासून आर्थिक जगाशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत .ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार (Change of rule) आहे. त्यामुळे नेमके काय बदल होणार हे पाहूया.

जीएसटी चे नियम बदलतील – सरकारच्या घोषणेनुसार 1 ऑगस्ट 2023 पासून पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना इलेक्ट्रॉनिक इन्व्हाईस द्यावे लागते. अशा परिस्थितीत जीएसटीच्या कक्षेत येणाऱ्या व्यावसायिकांनी संबंधित नियमांची तपशीलवार माहिती घेऊन इलेक्ट्रॉनिक इन्व्हाईस तयार करणे आवश्यक आहे.

आयकर रिटर्न भरण्याची आज शेवटची तारीख – काल 31 जुलै ही आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख हाती. त्यामुळे आज एक ऑगस्ट पासून आयटीआर भरणाऱ्यांना दंड भरावा लागेल .पाच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लोकांनी आयटीआर भरला नसेल  तर आजपासून  त्यांना एक रुपये ते पाच हजार रुपये पर्यंतचा दंड भरावा लागेल. तारीख वाढवण्याची कोणतीही घोषणा सरकारने केलेली नाही.

बँकांना 14 दिवस सुट्टी – रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिनासह विविध सणांमुळे ऑगस्ट मध्ये 14 दिवस बँक शाखा बंद राहणार आहे . या सुट्ट्यांमध्ये  शनिवार आणि रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे. मात्र या चौदा दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये बँकांच्या ऑनलाईन सेवा सुरू राहतील.

एलपीजी सिलेंडरच्या किंमती बदलण्याची शक्यता –  ऑगस्टमध्ये एलपीजी तसेच व्यवसाय सिलेंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे . तेल कंपन्या दर महिन्याच्या एक आणि सोळा तारखेला एलपीजीची किंमत बदलतात. या शिवाय सीएनजीचे व  पीएनजीचे दरही बदलू शकतात.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही बदल होऊ शकतो – तेल कंपन्या दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला मध्यरात्री पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. अशा परिस्थितीत एक ऑगस्ट पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होऊ शकतो. गेल्यावर्षी 21 मे पासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहे.

क्रेडिट कार्ड आणि कॅशबॅकशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार – ॲक्सिस बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर नवीन नियमानुसार ॲक्सिस बँक आणि फ्लिपकार्ट वरून खरेदी करणाऱ्यांना 12 ऑगस्टपासून खरेदीवर कॅशबॅक (Change of rule) मिळेल.

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आर्थिक जगतऑगस्टबदल
ADVERTISEMENT
Next Post
ब्रेकिंग : कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या ; चित्रपटसृष्टीवर शोककळा

ब्रेकिंग : कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या ; चित्रपटसृष्टीवर शोककळा

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group