म्हणून काँग्रेसने शिवसेनेसोबत महाविकास आघाडी केली… अशोक चव्हाण

परभणी: काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण  यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या आग्रहामुळे महाविकासआघाडी प्रत्यक्षात आली असा गौप्यस्फोट केला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीतील काँग्रेस नेते शिवसेनेसोबत युती करण्यास अनुकूल नव्हते असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

भाजपने  काँग्रेस संपवण्याचे काम सुरु केले होते. त्यामुळे काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत येण्यास तयार झाला. दिल्लीतील काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत युती करायची की नाही, या संभ्रमात होते. पण भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेबरोबर आघाडी करावी, असे राज्यातील काँग्रेस नेत्यांचे मत होते असे अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे.

सुरेश नागरे यांनी पक्षात घरवापसी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी परभणीतील बडे नेते सुरेश नागरे यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. त्यांनी  पक्षात घरवापसी केली आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत सुरेश नागरे यांचा पक्षप्रवेश झाला आहे. यावेळी सुरेश नागरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परभणी शहरातील एमआयडीसी भागातील व्यंकटेश मंगल कार्यालयात बैठक झाली. जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसींच्या पदाधिकाऱ्यांना अशोक चव्हाणांच्या हस्ते नियुक्त पत्रांचे वाटप करण्यात आले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: