नाणार प्रकल्पग्रस्त आज घेणार मनसे प्रमुख राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाणार प्रकल्प मुद्द्यावरून फेरविचार करण्याचा सल्ला दिला होता. या संदर्भात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अनेक मुद्दे त्या पत्रात सविस्तर मांडले होते. राज ठाकरे यांच्या या निर्णयावर शिवसेचे मंत्री उदय सांमत, खासदार विनायक राऊत यांनी काल प्रतिक्रिया दिल्या होत्या.

आता याच पार्श्वभूमीवर सोमवारी नाणारमधील काही प्रकल्पग्रस्त राज ठाकरे यांची आज भेट घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या मुंबईतील ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. त्यासाठी नाणारचे प्रकल्पग्रस्त रविवारी रात्रीच बसने मुंबईला रवाना झाले. काही वेळातच ते कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार १०० प्रकल्पग्रस्त राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यापैकी अनेकजण स्वतः जमिनीचे मालक आहेत. तसेच नाणार रिफायनरी प्रकल्प समर्थन समन्वय समितीचे अध्यक्षही या बैठकीला उपस्थित राहतील. यावेळी राज ठाकरे यांच्यापुढे नाणारमधील तब्बल 8500 जमीन मालकांची संमतीपत्रेही सादर करण्यात येतील. त्यामुळे आता राज ठाकरे नाणारच्या मुद्द्यावरुन काय भूमिका घेणार हे येणाऱ्या दिवसात समोर येईल.

Team Global News Marathi: