“.मग आमच्याबद्दल बोलता तरी का?”आदित्य ठाकरे यांचा फडवणीसांना टोला

 

गोवा | गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आणि मंत्री आदित्य ठाकरे प्रचार करण्यासाठी गोव्यात पोहोचले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज(१२ फेब्रु.)आदित्य ठाकरे यांनी पणजीमध्ये पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली. तसेच जर कुणाला आमचा पक्ष इतकाच कमकुवत वाटत असेल, तर मग आमच्याबद्दल बोलता तरी का?, असा सवालही आदित्य यांनी केला आहे.

मागच्या काही दिवसांपासून सातत्याने भाजप नेत्यांकडून शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल, अशी टीका करण्यात येत होती. या टीकेला आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले असून यासंदर्भात बोलत असतांना ते म्हणाले की,’जर कुणाला आमचा पक्ष इतकाच कमकुवत वाटत असेल, आमचे डिपॉझिट जप्त होणार असं वाटत असेल, तर मग आमच्यावर टीका कशाला करता? आमच्याबद्दल बोलता तरी का? भिती कसली वाटतेय? होऊ दे प्रचार.’

दरम्यान, पुढे बोलत असतांना ते म्हणाले की,’आमची जेव्हा भाजपसोबत युती होती, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंची ही भावना होती की मित्रपक्ष असेल, तर मैत्री स्वच्छपणे पुढे न्यायला हवी. कुठेही आपल्या मित्राला धोका निर्माण व्हायला नको. त्यांना मदत म्हणून आम्ही इतर राज्यात लढायचो नाही.’ तसेच मागील ५ वर्षांत आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला, असेही आदित्य म्हणाले.

Team Global News Marathi: