..मग संविधान पाळण्याचं नाटक कशासाठी?”, राऊतांचा खोचक सवाल

 

नवी दिल्ली | नवी दिल्लीत संविधान दिनानिमित्त आज संसदेच्यासेंट्रल हॉलमध्येही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमात संबोधित केलं. यावेळी काँग्रेस, समाजवादी पार्टी, डीएमके, टीएमसी यांसह इतर 14 पक्षांनी संसदेत झालेल्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचं समोर आलं आहे. आता शिवसेनेनेही या कार्यक्रमात सहभागी नसल्याचं सांगितलं आहे.

याबाबत बोलताना संजय राऊत यांनी मोदी सरकारला नाव न घेता अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. यावेळी ते म्हणाले, ‘देशात रोज संविधान पायदळी तुडवलं जातं. देशात संविधानाचं राज्य राहिलेलं नाही. हुकूमशाही पद्धतीने काम सुरु आहे. हे आपल्याला माहित आहे. मग संविधान पाळण्याचं नाटक कशासाठी?’ असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

राऊत पुढे म्हणाले, ‘मी राष्ट्रावादाविषयी म्हणत नाही. विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला आहे. राज्यघटनेतील अनेक कलमं, राज्याची अधिकार,संघराज्य व्यवस्था तोडली जात आहे. महाराष्ट्रातसुद्धा संविधानाच्या बाबतीतही राजभावनात काय सुरु आहे हे आपल्याला माहित आहे. मग हे नाटक कशाला?’ असा घणाघात त्यांनी केली आहे.

Team Global News Marathi: