जगातील सर्वात मोठ्या स्टील कंपनीच्या अध्यक्षपदाची सूत्रे आदित्य मित्तल यांच्या हातात

जगभरात नावाजलेल्या सर्वात मोठ्या स्टिल कंपनी ArcelorMittal या कंपनीची सूत्रे आता एका तरुण उद्योजकाच्या हातात येणार आहे. कंपनीचे फायनान्स चीफ आदित्य मित्तल यांना नवीन सीईओ म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच त्यांचे वडील लक्ष्मी निवास मित्तल यांची जागा घेतील. लक्ष्मी मित्तल आता कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणूनकंपनीचे काम बघणार आहेत. १९७६ मध्ये लक्ष्मी मित्तल यांनी कंपनी सुरु केली होती. आदित्य यांनी १९९७ मध्ये कंपनीचे कामकाज पाहणे सुरू केले होते. तेव्हापासून त्यांनी कंपनीच्या विविध फिल्डमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या

आदित्य यांचा जन्म २२ जानेवारी १९७६ मध्ये झाला होता. त्यांचा जन्म भारतात झाला. मात्र, बालपण इंडोनेशियात गेलं. त्यांनी जकार्ता इंटरनॅशनल स्कूलमधून हायस्कूलपर्यंतचं शिक्षण घेतलं. ते अर्थशास्त्राचे पदवीधर आहेत. अमेरिकेच्या पेनसिलवेनियाच्या व्हॉर्टन स्कूलमधून त्यांनी अर्थशास्त्राची पदवी घेतली आहे.

Team Global News Marathi: