संभाजीराजेंवर आंदोलनाची वेळ येणार नाही, अजित पवारांची ग्वाही

मुंबई : ६ जून रोजी शिवाजी महाराज छत्रपती झाले, त्यामुळे आज मी घोषणा करतोय येत्या ६ जूनपर्यंत जर राज्य सरकारने योग्य ती कार्यवाही केली नाही आणि निश्चित असा प्लॅन ऑफ अॅक्शन ठरवला नाही, तर आम्ही कोविड-बिविड काहीही बघणार नाही, असा इशारा संभाजीराजेंनी राज्य सरकारला शुक्रवारी दिला आहे. ६ जूनपर्यंत मी अल्टिमेटम देत आहे. त्यानंतर रायगडावरून आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचं संभाजी राजे म्हणाले आहे.

आता संभाजी राजेंच्या या इशाऱ्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केले आहे. संभाजी छत्रपती यांनी येत्या 7 जूनला मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनाला अजून वेळ आहे. आणखी 9 दिवस बाकी आहेत. तोपर्यंत मार्ग निघेल. या नऊ दिवसात खूप काही होईल. चर्चा होईल, मार्ग निघेल, असा विश्‍वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्‍त केला.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे संभाजीराजेंना आंदोलन करण्याची वेळ येणार नसल्याचे पवार यांनी सांगितले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सर्वांनी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन केले आहे. यावर विचारले असता पवार म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावर सर्वांनी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन चंद्रकांतदादांनी केले आहे. मग आम्हा सगळ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल.

Team Global News Marathi: