“तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळातील घोटाळे लवकरच बाहेर काढणार”

 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रानं यंत्रणेचा वापर केला तर महाराष्ट्रातील अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात गेलं असतं असं म्हटलं होतं. आता त्यांच्या या विधानावर रास्तवराडीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे. ते शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी एनसीबी कारवाई आणि विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र सांगितलंय की केंद्रानं यंत्रणांचा वापर केला असता अर्ध मंत्रिमंडळ तुरूंगात दिसलं असतं. आम्ही म्हणतो की पूर्ण मंत्रिमंडळ तुरूंगात टाका. जनता पाहतेय, बंगालमध्ये जनतेनं जे ऊत्तर दिलं तेच ऊत्तर तुम्हाला इथे मिळेल. तसेच भ्रष्टाचारासाठी सॉफ्टवेअर केल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता त्यावर नवाब मलिकांनी फडणवीस सरकारच्या काळात डिजीटल दलाल होता. फडणवीस सरकारच्या काळात काय- काय घोटाळे झाले हे लवकरच बाहेर काढू, असा इशारा नवाब मलिकांनी दिला.

शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी बोलताना एक वर्षांपासून शेतकऱ्यांकडं दुर्लक्ष केलं जातंय असं म्हटलं. केंद्र शेतकरी आंदोलनाला गांभीर्याने घेत नाही. आंदोलन भटकेल असं त्यांना वाटतं. लखीमपूर खेरी मध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली. शेतकऱ्यांकडं दुर्लक्ष करण्याऐवजी आंदोलन चर्चेतून सोडवलं आहे. शरद पवार त्यासंदर्भात सूचक वाक्य बोलत होते हे केंद्र सरकारला कळायला हवं, असं नवाब मलिक म्हणाले.

Team Global News Marathi: