बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणाला ठाकरे बंधू दिसले एकत्र
राज्याच्या जडणघडणीचा शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान मोठं आहे. बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे रिमोटद्वारे शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते अनावरण आज त्यांच्या ९५ व्या जयंती निमित्त झाले आहे.
सदर कार्यक्रम बृहमुंबई महानगर पालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष, राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार संजय राऊत, आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक मंत्री मंडळातील नेते मंडळी उपस्थित होते.
मात्र या कार्यक्रमाला एका वेगळे चित्र दिसून आले होते. ता कार्क्रमाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र दिसून आले होते.
यावेेळीी व्यासपीठावरून उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना पुतळ्याच्या वैशिष्ठांची माहिती देताना दिसून आले होते. हे चित्र भविष्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये दिसून यावे हीच तमाम मुंबईकरांची इच्छा आहे,