देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने ओलांडला 1 कोटींचा टप्पा
नवी दिल्ली । भारतात जरी कोरोनाचा वेग मंदावला असला तरी, देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 1 कोटींच्या पार गेला आहे. देशात गेल्या 24 तासात 25 हजार जणांना कोरोनाची लागण झाल्याने, कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा 1 कोटींच्या पार गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोनारुग्ण बरे होण्याचा प्रमाण अधिक असून, आतापर्यंत 95 लाखांपेक्षा जास्त जणांनी कोरोनावर मात केली आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात 25,153 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 1 कोटी 4 हजार 825 एवढा झाला आहे.
India's #COVID19 case tally crosses the 1-crore mark with 25,153 new infections; death toll at 1,45,136
Total numbers of recovered and active cases are 95,50,712 and 3,08,751 respectively pic.twitter.com/GSpwrMpiz2
— ANI (@ANI) December 19, 2020
सध्या देशातील विविध भागात 3 लाख 8 हजार 942 रुग्णांवर उपचार सुरू असून, उपचारादरम्यान आतापर्यंत 1 लाख 45 हजार 136 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत 95 लाख 50 हजार 712 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.