जानेवारीत कोरोनाची दुसरी लाट? आरोग्य विभागाकडून पूर्वतयारी,who च्या सूचनांची अंमलबजावणी होणार

युरोपातील कोरोनाच्या दुसऱया लाटेनंतर राज्यात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे अशी भीती राज्याच्या आरोग्य सेवा संचलनालयाने व्यक्त केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दहा लाख लोकसंख्येच्या मागे दररोज 140 तपासण्या करण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) केल्या आहेत. डब्ल्यूएचओच्या या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश आरोग्य सेवा संचलनालयाने जारी केले आहेत.

सध्या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून कोविड रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. पण जागतिक स्तरावरील कोविडच्या उद्रेकाचे प्रमाण लक्षात घेतले असता युरोपमधील अनेक देशांमध्ये कोविडची दुसरी लाट आलेली दिसून येते. युरोपिन देशांच्या उदाहरणावरून राज्यात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य सेवा संचलनालयाने कोरोनाच्या संभाव्य दुसऱया लाटेची पूर्वतयारी करण्यासाठी मागील आठवडय़ात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती.

सुपरप्रेडर्स कोण

किराणा दुकानदार, भाजीवाले, फूटपाथवरील विक्रेते, हॉटेल मालक, वेटर्स, वर्तमानपत्र घरी पोहोचवणारी मुले, घरकाम करणाऱया महिला, गॅस सिलिंडर वाटप करणारे कर्मचारी, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, लाँड्री, इस्त्राrवाले, पुरोहित, ट्रक ड्रायव्हर्स, टेम्पो चालक, रिक्षा चालक, हमाल, रंगकाम व बांधकाम करणारे मजूर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील कंडक्टर व इतर कर्मचारी, हौसिंग सोसायटीचे सुरक्षा रक्षक, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, पोलीस, होमगार्ड.

रुग्णालय व्यवस्थापन तयार

कोरोनाच्या दुसऱया लाटेत किती टक्के रुग्णांच्या प्रमाणात किती प्रमाणात कोविड रुग्णालये कार्यान्वित करावीत यासाठी रुग्णालय व्यवस्थापन तयार केले आहे.

लॅबमधील पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण सात टक्क्यांपेक्षा कमी असल्यास रुग्ण संख्येनुसार जिल्हा आणि पालिका स्तरावर किमान पाच ते सात रुग्णालये समर्पित कोविड रुग्णालये म्हणून कार्यरत ठेवावीत.

कोविड रुग्णांचे प्रमाण 7 ते 10 टक्के असल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रत्येक प्रभाग-तालुक्यात एक कोविड समर्तित रुग्णालय म्हणून करावे.

कोविड रुग्णाचे प्रमाण 11 ते 15 टक्के असल्यास आणखी वीस टक्के कोविड रुग्णालये कार्यान्वित करावीत.
कोविड रुग्णांचे प्रमाण 16 ते 20 टक्के असल्यास सर्व मल्टिस्पेशॅलिटी रुग्णालये कोविडसाठी करावीत.

कोविड रुग्णाचे प्रमाण 20 टक्क्यांहून अधिक असल्यास कोविडसाठी यापूर्वी निवडण्यात आलेली सर्व प्रकारातील रुग्णालये कोविडसाठी कार्यान्वित करावीत.
सुपरप्रेडर्सचे विशेष सर्वेक्षण

सुपरप्रेडर्सच्या माध्यमातून कोविडचा प्रसार अधिक होतो. दुसरी लाट येण्यासाठीही सुपरस्पेडर्स कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींचे सर्वेक्षण प्राधान्याने करण्याच्या सूचना आरोग्य संचलनालयाने दिल्या आहेत.

औषधे व ऑक्सीजन पुरवठा

महापालिका दवाखाने, खासगी छोटी रुग्णालये, छोटी क्लिनिक व रुग्णालयात ऑक्सीजन का@न्सेट्रेटर यंत्रे उपलब्ध ठेवावी. पुढील पंधरा दिवसांचा औषधांचा साठा हा बफर स्टॉक म्हणून तयार ठेवण्याच्या सूचना.

फटाकेमुक्त दिवाळी

यंदाची फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याच्या सूचना आरोग्य संचलनालयानेही जारी केल्या आहेत. फटाक्यांच्या धुरामुळे कोविड रुग्णांचा श्वसनाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींचा त्रास आखणीन वाढू शकतो.

ग्लोबल न्युज नेटवर्क: