उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका फोन वरती खडबडून उठली पोलिस यंत्रणा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका फोनने यंत्रणा हलवली आणि एका तरुणीच्या अपघाताची थांबलेली चौकशी वेगाने सुरु झाली आणि आरोपींना तातडीने अटकही झाली.कश्मिरा भंडारी या २० वर्षाच्या तरुणीचा ५ जानेवारी रोजी अपघात झाला होता. पुणे महानगरपालिकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या डंपरने तिच्या दुचाकीला धडक दिली होती.

या अपघातात कश्मिराचा मृत्यू झाला. या प्रकरणी तिच्या पालकांनी १३ जानेवारी रोजी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर अनेक दिवस उटलून गेल्यावरही याबाबत काहीही कारवाई होत नव्हती.याबाबत काहीच हालचाल होत नाही हे पाहिल्यावर कश्मिराच्या कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

त्यांना सर्व वस्तुस्थिती सांगितल्यावर त्यांनी थेट पुण्याच्या पोलिस आयुक्तांनाच फोन केला. त्यानंतर अपघाताच्या चौकशीची चक्रे वेगाने फिरू लागली.आता या प्रकरणी या कचरा वाहणाऱ्या वाहनाच्या चालकाला अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी दिरंगाई करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यास निलंबित करण्यात आले आहे.अजित पवारांनी केलेल्या या मदतीमुळे कश्मिराचे नातेवाईक त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहेत.

Team Global News Marathi: