आघाडी सरकारमधील पक्षांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज -चंद्रकांत पाटील
महाविकास आघाडी सरकारमधील घटकांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. ते आज कोल्हापूर येथे बोलत होते. सध्या राज्यात दूध दरवाढीवरून सर्वसामान्य हतबल झाला आहे. याच पाश्वभूमीवर भाजपा एक ऑगस्टला राज्यभर आंदोलन करणार असल्याची माहिती पाटील यांनी दिलेली आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज आहे. सरकार आता पडेल की नंतर या भीतीने त्यांना झोप येत नसेल. पण तुम्ही सरकार चालवा, आम्ही ते पाडण्यासाठी प्रयत्न करणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांना दिली आहे.
दूध दरवाढीसाठी भाजपने १ ऑगस्टला आंदोलनासाठी तयारी सुरु केली आहे. डेअरीना प्रतिलिटर दहा रुपये देण्याची भाजपची मागणी आहे. रासप, रयत क्रांती, रिपाइं या संघटनाही आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली