महाराष्ट्राबद्दल बोलणाऱ्यांचे पुढचे पाऊल राजकारणात पडते- संजय राऊत

महाराष्ट्राबद्दल बोलणाऱ्यांचे पुढचे पाऊल राजकारणात पडते- राऊत

ग्लोबल न्यूज: सुशांत राजपूत प्रकरणी मुंबई शहर आणि मुंबई पोलिसांवर आरोप करणारे बेहरचे पॉलसा महासंचालक लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देत येणाऱ्या बिहार निवडणुकीतुन राजकीय प्रवासाला सुरवात करणार आहे. हाच मुद्धा पकडत आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

पांडे हे राजकीय पक्षात जातील हे अपेक्षितच होते असे त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखविले आहे. सुशांत प्रकरणात बिहार पोलीस महासंचालक पांडे यांनी मुंबईवर बेछुड आरोप लावले होते. त्यातच बिहार निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी घेतलेली सेवानिवृत्ती चांगलीच चर्चेत आलेली आहे. या प्रकरणावर आता खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे एक सुनियोजित षडयंत्र रचलं जातं आहे. बिहारचे डिजीपी यांनी राजीनामा दिला आहे. यापूर्वी त्यांनी सातत्याने महाराष्ट्र आणि पोलिसांवर टीका केली. ते आता राजकीय पक्षात जातील. हे मला अपेक्षितचं होतं. जे, महाराष्ट्र, मुंबईबद्दल बोलतायेत त्यांचे पुढचे पाऊल राजकारणात, त्यासाठी महाराष्ट्र, मुंबईला पायपुसणं म्हणून वापरतात, असे त्यांनी बोलून दाखविले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: