राज्यासाठी पुढचे 3 तास महत्त्वाचे; मुंबई, पुण्यासह या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईत रिमझिम पावसाळा सुरवात

ग्लोबल न्यूज: दिवाळीनंतर मुंबईत थंडीची चाहूल लागलेली असताना आज सकाळी मुंबईत पावसाच्या हलक्या सारी कोसळल्या आहेत. त्यामुळे सकाळी कामावर निघणाऱ्या मुंबईकरांची एकच तारंबळा उडाली होती. सकाळी ६:०० वाजल्यापासून मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावली. सकाळी मुंबईच्या अनेक भागांत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. दादर, माटुंगा आणि माहिम भागांत पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या होत्या. मुंबईसह कोकणातही पावसाच्या सारी कोसळल्या आहेत.

मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्याच मुख्य कारण म्हणजे अरबी समुद्रात एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र आणखी पश्चिम दिशेने जाणार आहे. त्यामुळे आपल्याकडचे वातावरण ढगाळ स्वरुपाचं आहे. येत्या एक ते दोन दिवसांत हे ढगाळ वातावरण निवळण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबर समाप्त- डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत थंडीची चाहूल लागते. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईत सध्या ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे बदलेल्या वातावरणामुळे नागरिकांचे स्वास्थ बिघडण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञाकडून वर्तवली जात आहे.

राज्यातील ‘या’ भागांत पावसाची शक्यता

दरम्यान आजपासून तीन दिवस उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पालघर जिल्ह्यात काही ठिकणी अवकाळी पावसाची हजेरी तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण, पालघर तालुक्यातील, बोईसर, पालघर, माहीम, केळवे, सफाळे, सातपाटी, भागात पाऊस सुरू झाला आहे. यामुळे नागरिकांनी हवामानचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता

उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव आणि बंगालच्या उपसागरातून येणारे वारे त्याचा प्रभाव म्हणून मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेला जे क्षेत्र आहे तिथे मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे . दिनांक 11, 12 आणि 13 डिसेंबरच्या दरम्यान धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने अलर्ट जारी केलाय. (heavy Rain occur at isolated places in the distric

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: