संकट कुठलेही आले तरी शेतकरीच सर्वाधिक भरडला जातो. खरीप हंगामात सर्वात जास्त त्रासदायक ठरते ते युरिया मिळविणे. यासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता; पण शेतकऱ्यांसाठी आता इफ्को या खत निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून आनंदाची बातमी आली आहे. आता लिक्विड स्वरूपात युरियाची निर्मिती करणार असल्याचा निर्णय इफ्को कंपनीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
शेतकऱ्यांसाठी युरिया खताची खरेदी अत्यंत क्लेशदायक व अडचणीची ठरली आहे. युरिया खरेदीसाठी शेतकऱ्याच्या मोठमोठाल्या रांगा तुम्ही पाहिल्या किंवा अनुभवल्या असतीलच. एवढ्या मोठ्या रांगा लावून शेवटी प्रत्येकाला एक किंवा दोनच युरियाचा बॅग मिळतात, तर काही ठिकाणी इतर कमी प्रतीचे किंवा गरज नसलेले खते युरियासोबत घेण्याची सक्ती केली जात आहे. यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त असून शासनावर संतप्त आहेत.
युरियाचा कृत्रिम किंवा नैसर्गिक तुटवडा राज्य व केंद्र शासनाची डोकेदुखी ठरत आहे. शासनाला टंचाईची दखल घ्यावी लागली इतका हा विषय गंभीर झाला आहे. इफ्को खत निर्मिती करणारी कंपनी आता लिक्विड स्वरूपात युरियाची निर्मिती करणार आहे. याबाबतचा ठराव सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. नॅनो फॉर्ममध्ये असलेला हा लिक्विड युरिया या क्षेत्रातील मोठी क्रांती आहे.
अजित पवार म्हणाले,कोरोनाविरुद्धाची लढाई सर्वांनी मिळून एकजुटीने लढायची आहे. त्यासाठीच मी अन फडणवीस…
लिक्विड युरिया ठिबकद्वारे देता येईल.
एक एकर क्षेत्रासाठी केवळ अर्धा लिटर लिक्विड युरिया लागणार असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होणार आहे. शिवाय रांगा न लावता मिळालेले खत वेळेवर पिकाला दिल्याने उत्पादनात नक्कीच वाढ होईल. इफ्को या सहकारी रासायनिक खत कंपनीची सर्वसाधारण सभा २६ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे झाली. झूम अॅपद्वारे झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी कंपनीचे अध्यक्ष बलविंदर नकाई होते.
रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही अभ्यास करून बोलावं – फडणवीस