“या सरकारचं नाव ‘महावसुली सरकार’ ठेवायला हवं” फडणवीसांनी साधला निशाणा

 

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं असून अधिवेशनात भाजप पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याच दरम्यान आज भाजपच्या वतीने किसान मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला.

भाजप कार्यालय ते विधानभवन असा हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचं भाजपने आधीच सांगितलं होतं. त्यानुसार आज हा मोर्चा काढला. या मोर्चात भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर घनघाईती टीका केली होती.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, किसान मोर्चाच्या माध्यमातून आपण सर्वजण शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेवर धडकलात. तुमची दहशत किती आहे बघा… तुम्ही विधानसभेवर येण्यापूर्वीच विधानसभा तहकूब करुन दोन दिवसांकरता सरकार पळून गेलं.

तसेच या सरकारचं नाव ‘महावसुली सरकार’ ठेवायला हवं आम्हाला चर्चेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध समस्या मांडायच्या होत्या. पण सरकारच्या हे लक्षात आलं की, यातल्या कुठल्याच गोष्टीवर आपण उत्तर देऊ शकत नाही आणि म्हणून थेट सोमवारपर्यंत विधानसभा तहकूब करुन ही सर्व मंडळी निघून गेली. एक गोष्ट निश्चित आहे की आपल्याला संघर्ष करवाच लागेल.

Team Global News Marathi: