दीपालीवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करणाऱ्यांचा सरकारने खुलासा करावा – प्रकाश आंबेडकर

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांची आत्महत्या वाघ आणि साग तस्कारांमुळे तर झाली नाही ना याचा शोध घेण्याची गरज असल्याचे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.

दीपाली चव्हाण यांच्याविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकदा नाही तर दोनदा असा गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला. ज्यांनी दीपालीवर हा अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला त्यांची आर्थिक परिस्थिती, ते काय करतात, त्यांचा आणि वनविभागाचा काय संबंध आहे का? याबाबतचा खुलासा सरकारने करावा. जर सरकारने हा खुलासा केला नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या प्राध्यापक निशा शेंडे त्या अमरावतीतून सर्व माहिती जाहीर करतील.

तसेच एकंदरित असं दिसतंय की आधी कोणतीही संपत्ती नसणाऱ्या बाहेरच्या एनजीओंकडे भरपूर संपत्ती झाली आहे. या एनजीओंकडे आदिवासींच्या किती जमिनी आहेत त्याची देखील चौकशी झाली पाहिजे. मेळघाट आणि धारणीमध्ये गवळी समाज राहतो. तो खुल्या गटात येतो त्यामुळे त्याची जमीन वर्ग २ करुन विकली जाऊ शकते. पण आदिवासींच्या जमिनी विकतच घेतल्या जाऊ शकत नाही, असं कायदा सांगतो.” याची माहिती सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती.

Team Global News Marathi: