पाहिला विचार सामान्य जनतेचा, राष्ट्र्वादीने केले मुख्यमंत्र्यांचे कौतुक !

मुंबई : राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यातील जनतेशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला. तसेच आज रात्रीपासून पुढील १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र या १५ दिवसात मुख्यमंत्र्यांनी सर्व घटकांवर कोणताही परिणाम होणार नाही अशा प्रकारच्या घोषणा सुद्धा काल फेसबुक लाइव्हमध्ये केल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्र्वादीने मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ‘संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री संदेशाने सरकार चालतेय याचा प्रत्यय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून आला’ असं म्हणत कौतुक केले आहे.

आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री संदेशाने हे सरकार चालवू असा संकल्प आम्ही केला होता. आज मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या संबोधनातून त्याची प्रचिती आली आहे, असं मत जयंत पाटील यांनी ट्वीट करून मांडले आहे. राज्याला व जनतेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी आघाडीतर्फे प्रयत्न केले जात आहे असे सुद्धा बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: