२०२२ मधील पहिली संकष्टी चतुर्थी, गणेश पूजा करताना अजिबात विसरू नका ह्या चुका

 

मुंबई | भारतीय संस्कृतीत कोणत्याही पूजनाची किंवा शुभकार्याची सुरुवात गणपती पूजनाने केली जाते. प्रत्येक मराठी महिन्याच्या कृष्ण पक्षातल्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असं म्हंटल जात. त्या दिवशी उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आहे. हे व्रत कोणालाही करता येतं. उत्तर भारतात पाळल्या जाणाऱ्या हिंदू पंचांगानुसार सध्या माघ महिना सुरू आहे.

या पंचांगानुसार माघ महिन्यातल्या कृष्ण पक्षातल्या चतुर्थीला सकट चौथ असं म्हणतात. उत्तर भारतात सकट चौथचं व्रत श्री गणेशाच्या आराधनेसाठी केलं जातं. यंदा सकट चौथ आज २१ जानेवारी २०२२ रोजी आहे. त्याच दिवशी महाराष्ट्रातल्या पंचांगानुसार पौष महिन्यातली संकष्ट चतुर्थी आहे.

सकट चौथचं व्रत करताना करताना काही गोष्टी लक्षात ठेवण्याची आवश्यकता असते. २०२२ या नवीन वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी शुक्रवारी येत आहे. मराठी दिनदर्शिका आणि पंचागाप्रमाणे ही पौष कृष्ण चतुर्थी. पण याच दिवशी उत्तर भारतात सकट चौथचं व्रत करतात आणि तेही गणेश आराधनेसाठीच.

उत्तर भारतात विक्रम संवत्सराप्रमाणे कालगणना होते. २१ जानेवारीला या त्यांच्या पंचांगानुसार माघ महिन्यातल्या कृष्ण पक्षातल्या चतुर्थीला सकट चौथ असं म्हणतात. सूर्याकडे पाहताच येते कारण सकट चौथला अनेक जण तिलकुट चौथ असंही म्हणतात. या दिवशी आई तिच्या मुलांसाठी उपवास ठेवते आणि संध्याकाळी चंद्राला अर्घ्य अर्पण करून उपवास सोडते.

यावेळी तीळ आणि गुळापासून बनवलेल्या वस्तू सकट चौथला बनवल्या जातात व त्या गणपतीला अर्पण केल्या जातात. ‘या दिवशी गणपतीची पूजा करताना काही नियमांचं पालन केलं पाहिजे. जाणूनबुजून किंवा नकळत झालेल्या चुकांमुळे उपासनेचं आणि व्रताचं पूर्ण फळ मिळत नाही.

Team Global News Marathi: