सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय ; वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा ‘इतका’ अधिकार

 

नेहमी संपत्तीच्या कारणांवरून घरगुती भांडणे होत असतात. घरातील मुख्य व्यक्ती असलेल्या वडिलांच्या संपत्तीवर कुणाचा आणि किती हक्क यावरुन नेहमीच वाद होतात.दरम्यान हिंदू उत्तराधिकार कायद्यांतर्गत हिंदू महिला आणि विधवांचा वडिलांच्या संपत्तीच्या अधिकाराशी संबंधित प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर आणि न्यायमूर्ती कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने एका खटल्यावर सुनावणी करताना वडिलांच्या संपत्तीवर जितका मुलाचा हक्क आहे तितकाच मुलींचाही हक्क असणार असल्याचे म्हंटले आहे. घरातील मुख्य व्यक्ती असलेल्या वडिलांच्या संपत्ती संबंधित एका खटल्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे.

हिंदू उत्तराधिकार कायद्यांतर्गत हिंदू महिला आणि विधवांना संपत्तीच्या अधिकाराशी संबंधित प्रकरणी मद्रास न्यायालयाच्या एका निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयासमोर होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर आणि न्यायमूर्ती कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने सांगितले की, जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू मृत्यूपत्र न वनविताच झाला असेल तसेच ती मालमत्ता त्याने स्वत: कमवलेली असेल किंवा वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर त्या मालमत्तेचे कायदेशीर वारसांमध्ये विभाजन होते.

तसेच जर हिंदू पुरुषाचा मृत्यू झाला आणि त्याची मुलगी ही वारस असेल, तसेच त्या पुरुषाचे भाऊ किंवा भावांची मुले आदींमध्ये जर वडिलोपार्जित संपत्ती वाटली जात असेल तर त्या पुरुषाच्या मुलीला समान हक्क मिळणार आहे. या प्रकरणात मुलीने वडिलांनी स्वत: कमविलेल्या संपत्तीमध्ये हिस्सा मिळविण्यासाठी कोर्टाचा दरवाजा खटखटावला होता.

 

Team Global News Marathi: