तुमच्या मोबाईलमध्ये डिजिटल मतदार ओळखपत्र डाउनलोड करता येत

 

देशात अनेकजण स्मार्ट फोन वापरतात तसेच यामुळे अनेक गोष्टी सोप्या जात आहेत. तुम्हाला कोणत्या शहरात जायचं असेल तरी मोबाईलचा फायदा होतो. एकादी गोष्ट मोबाईलमध्ये शूट करुन घेता येते तसेच फोटो सुद्धा काढता येतात अशा विविध गोष्टी मोबाईलच्या वापरामुळे तुमच्यासोबत ठेवणं अगदी सोप्पं झालं आहे. भारत सरकारकडून चालवण्यात येणाऱ्या योजनांचा सुध्दा फायदा मोबाईलच्या साहाय्याने घेण्यात येतो.

भारत सरकारच्या बर्‍याच सेवा आता ऑनलाइन होणार आहेत, यामध्ये डिजी लॉकर, आधार, पदवी प्रमाणपत्रे, विमा प्रमाणपत्रे, वाहन दस्तऐवज आणि बरीच कागदपत्रे एकत्रित ठेवणार अॅप येणार आहे.


तुम्ही ज्यावेळी मतदान करण्यासाठी जाता, त्यावेळी तुम्हाला तुमचे डिजिटल मतदार ओळखपत्र सोबत असणं गरजेचं असतं. तुमचे डिजिटल मतदार ओळखपत्र तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ठेऊ शकता. इंटरनेटशी कनेक्ट असलेल्या मोबाईल, टॅबलेट किंवा लॅपटॉपवर डिजिटल मतदार ओळखपत्र कसे डाउनलोड करायचे याची प्रक्रिया देण्यात आली आहे.

या लिंकवरती क्लिक करा

Go to https://eci.gov.in/e-epic/

भारतीय निवडणूक आयोगाच्या विविध कामांसाठी वरती दिलेली अधिकृत वेबसाइट आहे. विशेष म्हणजे अधिकृत वेबसाईटवर जाऊन नवीन मतदारांची नोंदणी करणे, तुमच्या मतदान कार्डमध्ये बदल करणे, त्याचबरोबर डिजिटल मतदार ओळखपत्र डाऊनलोड करण्यासाठी वापर केला जातो. या वेबसाईटला e-EPIC असेही म्हणतात.

Team Global News Marathi: