परीक्षा झालीच पाहिजे, रोहित पवार तसेच सत्यजित तांबे आक्रमक, मुख्यमंत्र्यांना लक्ष घालण्याची केली विनंती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आयोगाच्या या निर्णयाविरोधात पुण्यातील विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले आहेत. तसेच राजकीय क्षेत्रातील विविध नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे.

यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही सरकारला या निर्णयाबाबत पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आहे. तर युवक काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी आयोगाच्या या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

यापुढं कोरोनामुळे कोणतीही गोष्ट न थांबवता कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढं जावं लागेल. त्यासाठी लोकही सहकार्य करतील असा विश्वास आहे. त्यानुसारच MPSCची परीक्षा झाली पाहिजे. मुख्यमंत्री साहेब आणि अजितदादा आपण याकडं लक्ष द्यावं, ही विनंती!” असं ट्वीट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

तर युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सुद्धा या संदर्भात ट्विट केले आहे. एमपीएससीची परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्याचा जो निर्णय आज झाला आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो. करोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पध्दतीने अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे ? ह्या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहीजे” असे ट्विट त्यांनी केले आहे.

Team Global News Marathi: