धनंजय मुंडे यांच्या संदर्भात आम्ही घेतलेला निर्णय योग्य, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
ग्लोबल न्यूज: सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा या महिलेने मुंडेंविरोधातील बलात्काराची केलेली तक्रार मागे घेतली आहे. यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे.
सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय निष्कर्षाला येऊ नये, असे मी सुरुवातीलाच म्हटले होते असं वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. पवार म्हणाले की, ‘रेणू शर्मानी केस परत घेतली असल्याचं समजलं. आम्हाला प्रथमदर्शनी सातत्य पडताळण्याची गरज वाटते. याच्या खोलात जाण्याची गरज आहे असं मी आधीच म्हटलो होतो.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, आमचा निर्णय बरोबर होता असं आता वाटतंय. त्यामुळे आता जे झालं त्यानुसार आमचा निर्णय योग्य होता’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. एकंदरीतच मुंडे यांच्यावरील विश्वास खरा ठरला असंच यावरून म्हणावं लागेल.